रामनामाची वही व महत्त्व

‘रामनाम वही’ ही २२० पानांची वही आहे, जी भक्तांना सोप्या स्वरूपात भगवत्‌नाम, गुरुनाम लिहिण्याबरोबरच नाम-उच्चारणाचीही सुवर्णसंधी देते. ह्या वहीत पहिल्या १०८ पानांवर ‘राम’ नाम लिहायचे असते. पुढील प्रत्येकी २८ पानांवर अनुक्रमे ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ’कृष्ण’, ’दत्तगुरु’ व ’जय जय अनिरुद्ध हरि’ हा मंत्र लिहायचा असतो. रामनाम वहीच्या प्रत्येक पानावर भक्तिमार्गाचा अग्रणी, श्रीरामप्रभूंचा दास असणार्‍या श्री हनुमंताच्या साक्षीने प्रत्येक नाम लिहीले जाते.

श्रीहनुमंताच्या आकृतिबंधात ‘राम’ नाम लिहिण्याचे महत्त्व खूप वेगळे आहे. जेव्हा आपल्या श्रद्धेय सीतामाईला लंकेमधून आणण्यासाठी ‘श्रीरामेश्वर ते लंका’ असा अभेद्य सेतू वानरसैनिकांना बांधायचा असतो, तेव्हा स्थापत्यशास्त्रातील अत्युच्च आचार्य असणार्‍यात भौम ऋषींकडे शिक्षण घेतलेले नल व नील हे वानरवीर हा सेतू बांधण्याच्या कार्यास सुरुवात करतात. परंतु कार्याचे व्यापकत्व व दुर्गमता जाणून श्रीहनुमंत वेळीच पुढे सरसावतात व समुद्रात टाकल्या जाणार्यात प्रत्येक पाषाणावर स्वहस्ते ‘श्रीराम’ नाम लिहू लागतात. श्रीरामनामाने अजीव व जड पाषाणही पाण्यात बुडत नाहीत, तर तरंगतात व त्यांच्या समुदायाने समुद्रावर सेतू बांधला जातो. श्रद्धावान जेव्हा रामनाम वही लिहीत असतो, तेव्हा त्याच्याही जन्मजन्मांच्या प्रवासातील अनेक सुंदर सेतू असेच सहजतेने श्रीहनुमंत बांधून घेतात, अशी श्रद्धावानांची भावना आहे.

या रामनाम बॅंकेचे महत्त्व सांगताना सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणतात,‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा एक महामार्ग, जो सरळसाध्या श्रद्धावानालाही सुखी जीवनाच्या वाटेवर घेऊन जातो, त्याला भक्कम आधार देतो.’

अशाप्रकारे जप लिहीण्याचा कोटीगुणे लाभ सर्व श्रद्धावान मित्रांनाही मिळावा ह्या तळमळीपोटीच सद्‍गुरु श्री अनिरुद्धांनी ही रामनामाची वही दिली.

रामनाम वहीतील पाचही मंत्र जिवंत आहेत, रसमय आहेत. हनुमंत चिरंजीव आहे व अखंड रामनामाचा जप करतो. जेव्हा मी रामनाम उच्चारतो, तेव्हा ते रामनाम आपोआप हनुमंताच्या उच्चारात सामावले जाते. थोडक्यात, रामनाम वही लिहिताना मी एकटा नाही, तर हे नाम ‘जो’ नित्यत्वाने उच्चारत आहे, त्याच्याशी मी सहज जोडला जातो, हा महत्वाचा लाभ रामनाम वही लिहिण्याने मला मिळतो.

काही विशेष प्रसंगी म्हणजेच वाढदिवस, लग्न अशा निमित्ताने किंवा आपल्या आप्तांच्या सुख व समृद्धीच्या प्राप्तीसाठी त्यांच्या नावे वही लिहून जमा करता येते. ही वही जो श्रद्धावान लिहितो त्यालाही आणि ज्याच्या नावे ही वही लिहिली आहे त्यालाही याचा लाभ मिळेल. मृत व्यक्तीच्या नावे रामनाम वही लिहिली, तर दिवंगताला रामनामामुळे पुढची गती अधिक चांगली मिळते अशी श्रध्दावानांची भावना आहे.

रामनाम वही लिहिताना लिहिणार्‍याच्या हातून नवविधा भक्तीतील श्रेष्ठ ‘श्रवण’ भक्ती घडतेच कारण नाम लिहिताना डोळ्यांनी ते वाचले जाणार आहे, जप मनाने उच्चारला जाणार आहे व त्याच वेळी त्याचे सहज श्रवणही होणार आहे, म्हणूनच रामनाम वही म्हणजे सहज भक्ती करण्याचे, ध्यान करण्याचे पवित्र साधन आहे.

रामनाम वही – जप संख्या

जप जप संख्या
राम
श्री राम जय राम जय जय राम
कृष्ण
दत्तगुरु
जय जय अनिरुद्ध हरि


Contact Us

Address:

101, Link Apartments, Old Khari Village, Khar (W), Mumbai – 40052, Maharashtra, India

Email Address: aubr.ramnaam@gmail.com

Timing: Monday to Saturday – 11 am to 7.30pm  (Excluding Thursday)

              Thursday: Thursday 11 am to 4 pm