सभासदत्व व लाभ

‘रामनाम’ आणि त्याचबरोबर इतर जप लिहिणे हेच या आगळ्यावेगळ्या बँकेचे भक्तिचलन आहे. कमीत कमी एक वही लिहून ती जमा केली की ह्या रामनाम बँकेचा सभासद होता येते. सभासद झाल्यावर प्रत्येक श्रद्धावानाला एक पासबुक दिले जाते.

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) सांगतात की, श्रद्धावानाला जेव्हा संकट काळात मदतीची, आधाराची खरी गरज असेल, तेव्हा सद्गुरुतत्व, ते परमतत्त्व त्याला ह्या ‘भक्ति बँकेतून’ आवश्यक तेवढे सहाय्य नक्कीच पुरवणार. ज्याचे त्याच्या सद्गुरुतत्त्वावर जेवढे प्रेम त्याला त्या प्रमाणात त्याचे ‘भक्तिरूपी व्याज’ सहाय्याच्या स्वरूपात मिळते.

बँकेच्या कामकाजाचे वर्ष अनिरुद्ध पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) ते अनिरुद्ध पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) असे आहे. सर्व ‘सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रं’ ह्या बँकेच्या शाखा आहेत. ही बँक युनिव्हर्सल असल्यामुळे श्रद्धावान आपली लिहून पूर्ण झालेली वही कुठल्याही शाखेत जमा करू शकतात.

प्रत्येकाची वही प्रत्येकाने स्वत:च लिहून पूर्ण करायची आहे. रामनाम वहीच्या पहिल्या पानावर (अर्पण पत्रिकेवर) आपले संपूर्ण नाव, खाते क्रमांक व वही कोणासाठी लिहिली आहे याची माहिती असते. श्रद्धावानांनी अशाप्रकारे जमा केलेल्या प्रत्येक वहीतील पहिली पाने (अर्पण पत्रिका) प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा एकादशीला एकत्र करून त्यांचे पूजन केले जाते.

एका वर्षामध्ये श्रद्धावानाने किमान १८ वह्या जमा केल्यावर त्या श्रद्धावानाला त्या वर्षाचे बॅंकेचे वार्षिक सभासदत्व मिळते. खाते उघडलेल्या तारखेपासून पुढील पाच वर्षात १५० वह्या जमा केल्या, तर तो श्रद्धावान बँकेचा आजीव सभासद होतो. वही लिहिणार्‍या श्रध्दावानाला ठराविक वह्या लिहिल्यानंतर विशिष्ट लाभ मिळतात. श्रद्धावानांनी जमा केलेल्या ह्या रामनाम वह्यांपासूनच गणेशमूर्ती व सच्चिदानंद पादुका तयार केल्या जातात. त्यामुळे ही ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ भक्तिच्या पवित्र साधनाबरोबरच प्रत्यक्ष जीवनात आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासही मोलाचे योगदान देते.

 

हिंदी English

 



Contact Us

Address:

101, Link Apartments, Old Khari Village, Khar (W), Mumbai – 40052, Maharashtra, India

Email Address: aubr.ramnaam@gmail.com

Timing: Monday to Saturday – 11 am to 7.30pm  (Excluding Thursday)

              Thursday: Thursday 11 am to 4 pm